यशोगाथा -१ स्त्रीशक्ती महिला स्वयंसहाय्यता समूह,शिरगाव कवठे.

स्त्रीशक्ती महिला स्वयंसहायता समूह

शिरगाव कवठे.

उमेद महिला बचत गट

       उमेद अभियानामुळे जागृत  झालेल्या महिलांचा प्रवास हा प्रगतीकडे होत असून महिला आज स्वतःचे निर्णय स्वतः घेत आहेत. संघठन करून आपली प्रगती करीत आहेत.व्यवहारज्ञान आत्मसात करून एक नवीन उंची गाठत आहेत.

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील शिरगाव कवठे हे एक गाव.तासगाव शहराला लागून असले तरी महिलांना घर ते चूल एवढेच स्वातंत्र्य.तरीही काही महिला प्रगतीशील, त्यांच्या मनात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते.अशाच काही महिलांनी १ /१ /२०१७  रोजी एकत्र येऊन स्त्रीशक्ती महिला स्वयंसहायता समूहाची स्थापना केली. मासिक १०० रुपये बचत करून गटाला सुरुवात झाली. उमेद अभियानाची माहिती मिळाल्यानंतर व उमेद चे महत्व पटल्याने गटातील सर्व महिलांनी आपला गट अभियानामध्ये सामील करण्याचे ठरवले.

गट अभियानास जोडल्यानंतर महिलांना दशसुत्री चे महत्व पटले.त्यानुसार गटाची आठवडी बैठक होण्यास सुरुवात झाली. महिला ग्रामसभेस उपस्थित राहू लागल्या.आपले प्रश्न ग्रामसभेत निर्भीडपणे मांडू लागल्या.आरोग्यविषयक काळजी घेऊ लागल्या. महिन्यातून एकदा गावातील आरोग्य सेविका यांना गटाच्या मिटिंग ला बोलावले जाते व त्यांच्याकडून योग्य मार्गदर्शन घेतले जाते.गटातील सर्व महिला अस्मिता sanitary pad चा वापर करतात. गटातील काही महिला अस्मिता pad खरेदी करून गावामध्ये इतर महिलांना माफक दरात देतात त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळते.

अस्मिता प्लस asmita plus sanitory pad

 

गट अभियानास जोडल्यानंतर काही दिवसात गटाला अभियानाकडून  १५०००/- रुपये खेळते भांडवल मिळाले. IDBI बँकेमार्फत गटाला प्रथम कर्ज १ लाख २० हजार रुपये मंजूर झाले आणि गटातील महिलांच्या लघु उद्योगास सुरुवात झाली.गटाच्या अध्यक्षा सौ. स्वप्नाली पाटील यांनी नानकटाई बिस्कीट बनवण्याचे मशीन खरेदी केले.  सौ. रुपाली राहुल पाटील यांनी cloths drayer बनविण्याचा व्यवसाय सुरु केला. सौ. मोनिका अमोल पाटील यांनी उडीद , नाचणी , तांदूळ यांपासून पापड निर्मिती चा व्यवसाय सुरु केला.सौ.त्रिशला सुहास हरोले यांनी गावामध्ये पिठाची गिरण सुरु केली. काही महिलांनी शिलाई मशीन खरेदी करून कापडी पिशव्या, स्कूल bags, traval bags बनविण्यास सुरुवात केली. शेतीस पूरक व्यवसाय म्हणून दुग्धपालन करण्याकरिता इतर महिलांनी गाय, म्हैस खरेदी केल्या.

२०१८ व २०१९ मध्ये इस्लामपूर येथे आयोजित केलेल्या दक्खन जत्रेमध्ये गटाचा सहभाग होता.त्याचबरोर कोल्हापूर येथे झालेल्या ताराराणी महोत्सव मध्ये हि गटाचा सहभाग होता. कोल्हापूर येथील श्री साई समर्थ फौंडेशन मार्फत गटाला आदर्श बचत गट पुरस्कार मिळालेला आहे.

रोजगार हमी योजने अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या बिहार pattern मध्ये गटातील सर्व महिलांचा सक्रीय सहभाग आहे.

स्त्रीशक्ती महिला स्वयंसहायता समूह म्हणजे महिलांना त्यांच्या हक्काची , प्रगतीची आणि विकासाची वाट निर्माण करून स्वताच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा देणारा समूह. या समूहाच्या यशाचे गमक म्हणजे एकीची भावना. यातूनच हा गट आजपर्यंत सुरळीत सुरु आहे.कुठलेही अंतर्गत कलह नाहीत, संकुचित वृत्ती नाही अशा व्यापक विचारांच्या पायावर हा गट उभा आहे.गावातील इतर गटांनी या गटातून प्रेरणा घेऊन जर गट सुरु केले तर संपूर्ण गाव विकासाच्या प्रवाहात येईल व शाश्वत उपजीविकेकडे वाटचाल करेल.

Share this:

Leave a comment