यशोगाथा – २ अष्टविनायक महिला स्वयंसहाय्यता समूह , धुळगाव.

आत्मनिर्भर..

             तासगाव तालुक्यापासून १५किमी  अंतरावर धुळगाव हे गाव आहे.गावची एकूण लोकसंख्या २३८१ असून या गावात केवळ २ बचत गट होते.या गावात उमेद चे कार्य सुरु झाले.अभियानामध्ये सध्या या गावातील १० बचत गट कार्यरत आहेत. त्यापैकीच एक अष्टविनायक महिला बचत गट.या गटामध्ये एकूण ११ महिला आहेत.त्यापैकी सायराबानू जमीर पठाण यांची हि यशोगाथा.

पतीच्या निधनानंतर सायराबानू या स्वत:च कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.गावामध्येच अंगणवाडी सेविका म्हणून कार्य करतात पण त्यातून मुलांच्या शैक्षणिक  व घरच्या गरजा भागवणे कठीण होते.एक दिवस त्यांना उमेद अभियानाची माहिती मिळाली.त्यातून त्यांनी पुढाकार घेऊन गट स्थापन केला.प्रति सदस्य २५/- रु. याप्रमाणे आठवडी बचत सुरु झाली.अभियानामार्फात ३ महिन्यानंतर रु.१५०००/- चे खेळते भांडवल मिळाले.सायराबानू यांची निकड लक्षात घेऊन गटाने त्यांना शिलाई मशीन खरेदी साठी १००००/- रु. चे कर्ज दिले.

              सायराबानू यांनी शिलाई मशीन च्या सहाय्याने कापडी पिशव्या शिवण्याचा व्यवसाय सुरु केला आहे.
            
       सांगली मधील स्टार या कंपनी मधून त्यांना पिशव्या शिवण्यासाठी लागणारा कच्चा माल मिळतो.
त्यातून त्यांना चांगला नफा मिळतो.त्यांच्या मते गटामुळे आज त्यांच्या मनात अशी जिद्द निर्माण झाली आहे कि आपण
 काहीतरी कमावून आपला संसार संभाळू शकतो.कितीही संकटे आली तरी गटाचा आधार आहे असे त्यांना वाटते.
त्यांच्या मते आज त्या गटामध्ये नसत्या तर त्यांना हे बदल पहावयास मिळाले नसते.
तसेच त्या इतर महिलांना गटाबद्दल माहिती देत असतात जेणेकरून हि चळवळ वाढत राहावी.




Share this:

Leave a comment