यशोगाथा – ३ माऊली महिला स्वयंसहाय्यता समूह , शिरगाव कवठे.

शिरगाव कवठे हे ३६५ कुटुंबाचे तासगाव तालुक्यातील एक गाव. येथील आश्विनी ताईच्या किरकोळ उद्योगाने आज इतर महिलांना प्रोत्साहन मिळत आहे. पतीच्या निधनानंतर सासू व ४ मुलींसह संसार सांभाळून मुलींच्या शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यास मदत करणाऱ्या ताईचे आज कौतुक केले जात आहे.पती निधनानंतर त्या अल्पभूधारक शेती करीत संसाराचा गाडा चालवत होत्या.परिस्थिती अत्यंत बिकट व हालाखीची होती.चार मुलींसह संसार सांभाळणे कठीणच होते.याकरिता शेतमजुरी करून मुलींना शिकविण्याचा निर्धार त्यांनी केला.

वर्धिनी फेरी दरम्यान गावात वर्धिनी आल्या.त्यांनी गावातील महिलांना बचत गटाचे महत्व समजावून सांगितले.आपण या परिस्थितीतून थोडी फार बचत करू या आशेने आश्विनी  ताई माऊली स्वयंसहायता समूहाच्या सदस्य म्हणून सहभागी झाल्या.दहावी पर्यंतचे शिक्षण झाले असल्याने त्यांना वर्धिनी मार्गदर्शनाअंतर्गत गटांच्या लेख्यांची चांगली ओळख झाली.त्यांच्यातील नेतृत्व गुण आणि शिक्षण बघून ‘उमेद’ अभियानाच्या वतीने गावपातळीवर काम करण्यासाठी त्यांची अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून निवड करण्यात आली.

आश्विनी ताईच्या आयुष्यातील हा क्षण मोलाचा ठरला.त्यांच्यात नवीन आत्मविश्वास निर्माण झाला.सांगली येथील प्रशिक्षणानंतर त्या गटांसाठी काम करू लागल्या.गटाना प्रत्येक गोष्टीत योग्य मार्गदर्शन करू लागल्या.महिलांना दशसूत्री चे महत्व पटवून देऊ लागल्या.याचाच परिणाम म्हणजे गावात प्रथमच गटांतील सर्व महिला ग्रामसभेस उपस्थित राहू लागल्या.आपले प्रश्न ग्रामसभेत मांडू लागल्या.

गावातील गटांचे ग्रेडेशन करण्यात आले.त्यानुसार माऊली स्वयंसहायता समूहास ‘अ’ श्रेणी मिळाली.त्यानुसार गट १५०००/-रु. इतका फिरता निधी मिळण्यास पात्र ठरला.गटांसाठी काम करत असतानाच आश्विनी ताईनी शिवणकाम करण्याचे ठरविले.यासाठी त्यांनी गटाकडून १००००/-रु.कर्ज घेतले. या पैशातून त्यांनी नवीन शिवनयंत्र घेतले.यातून त्यांना दररोज १५० ते २०० रु.मिळतात.आता मुलांना चांगले शिक्षण कसे मिळेल याकडे त्यांचे लक्ष आहे.

umed yashogatha

आश्विनी ताई म्हणतात, “गावात स्वयंसहायता समूह तयार झाल्यानंतर मी स्वतःहून अनेक गटाना मदत करत असे.त्यामुळे  गटाच्या वतीने माझे अंतर्गत समुदाय संसाधन व्यक्ती म्हणून नाव सुचवण्यात आले.यानंतर प्रशिक्षनादरम्यान मी अनेक महिलांनी आपले आयुष्य कसे सावरले ते बघितले त्यामुळे माझ्यातील न्यूनगंड दूर झाला.माझे एकटेपण आता कमी झाले आहे.

– अश्विनी अनिल अर्जुन ( CRP )

Share this:

1 thought on “यशोगाथा – ३ माऊली महिला स्वयंसहाय्यता समूह , शिरगाव कवठे.”

  1. आम्हाला तुमचा अभिमान आहे वहिनी 💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    Reply

Leave a comment