यशोगाथा -४ यशस्वी प्रेरिका

यशस्वी प्रेरिका

मतकुनकी येथील यशोधरा महिला स्वयंसहायता समूहातील सोनिया सचिन माने यांची ही यशोगाथा जी गावातील इतर महिलांना प्रेरणा देते.

सोनिया ताईंचे बीए पर्यंत झालेलं शिक्षण .काहीतरी करून स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची तीव्र इच्छाशक्ती परंतु लग्नानंतर संधी न मिळाल्यामुळे शेती व घरकाम यामध्येच त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलं.उमेद अभियानाअंतर्गत  समुदाय संसाधन व्यक्ती बनून त्यांना हि संधी मिळाली आणि या संधीच त्यांनी सोन करून दाखवल.

उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात तासगाव तालुक्यामध्ये सुरु झाल्यानंतर दारिद्र्य निर्मुलन व गरिबीतून कुटुंबाना बाहेर काढण्याच्या उद्देशाने अभियानाची वाटचाल सुरु झाली.सन २०१९ मध्ये तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, तासगाव मार्फत मतकुनकी गावामध्ये वर्धिनी फेरी चे नियोजन करण्यात आले. या फेरीअंतर्गत वर्धिनी च्या मार्गदर्शनामुळे सोनिया ताई ना बचती चे महत्व पटले.विविध शाश्वत उपजीविकेच्या संधी बद्दल माहिती मिळाली. त्यांनी १० महिलांना एकत्र करून यशोधरा महिला स्वयंसहायता समूह  स्थापन केला. वर्धिनी फेरीअंतर्गत त्यांची समूह संसाधन व्यक्ती म्हणून निवड झाली.

दशसुत्री प्रमाणे गावातील महिलांना त्या मार्गदर्शन करू लागल्या.गावात त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. काम करत असताना त्यांनी शाश्वत उपजीविकेवर विशेष भर दिला. त्याचाच परिणाम म्हणजे गावात महिलांनी वेगवेगळे व्यवसाय करण्यास सुरुवात केली.तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष तासगाव मार्फत राबवण्यात आलेल्या  बिहार pattern वृक्ष लागवड ची त्यांनी गावामध्ये चांगल्या प्रकारे अंमलबजावणी केली.

गटाला ६ महिने पूर्ण झाल्यानंतर यशोधरा समूहाला १ लाख रुपये कर्ज बँकेकडून मंजूर झाले. त्यातील २०  हजार रुपये सोनिया ताईंनी कर्ज म्हणून घेतले व त्यातून ब्युटी पार्लर चा व्यवसाय घरीच सुरु केला.त्यातून त्यांना चांगला नफा मिळू लागला.काही दिवसातच त्यांनी गावातच स्वतःचे ब्युटी पार्लर सुरु केले.  शिवाय त्या गटातील इतर महिलांना या व्यवसायाबद्दल मार्गदर्शन करतात.

SHG Success Story

त्यांच्यातील व्यवसायाबाबत असणारे कौशल्य ओळखून २०२३ मध्ये त्यांची DRP म्हणून निवड करण्यात आली.अभियानाशी निगडीत काम करणाऱ्या गावापुरत्या मर्यादित असणाऱ्या सोनिया ताई आज तालुक्यातील इतर गावात भेट देऊन उद्योग व्यवसायासंदर्भात मार्गदर्शन करतात.

आज सोनिया ताई सामाजिक जीवनात आत्मविश्वासाने वावरतात.त्या म्हणतात, “मी स्वतः गटामध्ये सहभागी होऊन कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारू शकले आहे, इतर महिलांनीही हा मार्ग स्विकारून कुटुंबाचे आर्थिक प्रश्न दूर करावेत.”

                                                                                                                                                 सोनिया माने

Share this:

2 thoughts on “यशोगाथा -४ यशस्वी प्रेरिका”

  1. I m proud of you mam…I really appreciate your efforts and hard work. If everyone ledy has to go for this pathway then sure village development will be done. you are ideal for others.

    Reply

Leave a comment