महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान- उमेद Msrlm Umed Information In Marathi

या लेखामध्ये आपण महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान- उमेद म्हणजे काय? Msrlm Umed Information In Marathi हे पाहणार आहोत. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान NRLM (National Rural Livelihood Mission) म्हणजेच स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे SGSY (Swarnjayanti Gram Swarojagar Yojana) झालेले रुपांतर होय.राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान – उमेद Msrlm Umed मार्फत हे अभियान राबविण्यात येत आहे.दारिद्र्याचे निर्मुलन करण्यासाठी ग्रामीण भागातील गरिबांना एकत्र आणून,त्यांच्यामार्फत त्यांच्याच सक्षम संस्था उभारणीसाठी सुलभीकरण करणे तसेच या संस्थांमार्फत गरिबांना वित्तीय सेवा मिळविण्यास मदत करणे,गरिबांची तसेच त्यांच्या संस्थांची क्षमता वृद्धी व कौशल्य वृद्धी करणे आणि शाश्वत उपजीविकेची साधने उपलब्ध करून घेण्यसाठी तसेच दारिद्र्याच्या बाहेर पडण्यासाठी मदत करणे हे अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.प्रत्येक गरीबामध्ये गरिबीतून बाहेर पडण्याची तीव्र इच्छाशक्ती असते.तसेच अंगभूत क्षमता हि असते.या इच्छाशक्तीला व अंगभूत क्षमतेला जागृत करून त्याला अंतर्बाह्य सक्षमीकरणाची जोड महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-उमेद मधून मिळते.Msrlm Umed Information In Marathi

अभियानातील लक्ष्यगट-

             राज्याच्या ग्रामीण भागातील गरीबातील गरीब कुटुंब हे अभियानाच्या केंद्रस्थानी आहे.या गरीब कुटुंबामध्ये अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,भटक्या विमुक्त जाती व जमाती यांच्याबरोबरच अन्य जाती जमाती व खुल्या प्रवर्गातील गरीबातील गरीब व्यक्ती अभियानातील लक्ष्य गट आहेत.समाजातील महिला,अपंग ,भूमिहीन, अत्यल्प किंवा अल्पभूधारक,प्रकल्पबाधित,स्थलांतरित मजूर,वेठबिगार,निराधार,परितक्त्या ,विधवा,एकल स्त्री,तृतियपंथी,जोगीण,देवदासी,वेश्या,मानवी मैला वाहतूक करणारे इत्यादी वंचित घटकांना संघटन,क्षमता बांधणी व अर्थसहाय्य या माध्यमातून जीवनोन्नतेची संधी उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान- उमेद कार्यरत आहे.

अभियानाची उद्दिष्ट्ये-

  •  दारिद्र्यनिर्मुलन करण्यासाठी ग्रामीण भागातील गरिबांना एकत्र आणून, त्यांच्या सक्षम संस्था उभारणीसाठी त्यांना सहाय्य करणे
  •  अशा संस्थांच्या क्षमता,वृद्धी व कौशल्य यांचा विकास करणे.
  • या संस्थामार्फत गरिबांना वित्तीय सेवा मिळण्यास मदत करणे.
  • अशा लोक संस्थांमार्फत उपजीविकेच्या शाश्वत साधनांच्या आधारे गरिबांना दारिद्र्याच्या बाहेर येण्यासाठी मदत करणे.

अभियानाची दशसुत्री-DASHSUTRI UMED MSRLM

अभियानाअंतर्गत तयार होणारे स्वयंसहाय्यता समूह हे दहा सूत्रांनुसार चालविले जातात.

यातील पहिल्या पाच सूत्रांचा समावेश हा धनव्यवहार मध्ये होतो.

  1. नियमित बैठक
  2. नियमित बचत
  3. नियमित अंतर्गत कर्ज व्यवहार
  4. नियमित कर्जाची परतफेड
  5. नियमित लेखे अद्ययावत ठेवणे

पुढील पाच सूत्रांचा समावेश हा मनव्यवहार मध्ये होतो.

  1. आरोग्य व स्वच्छता
  2. शिक्षण
  3. पंचायत संस्थांमध्ये सहभाग
  4. शासकीय योजनामध्ये सहभाग
  5. शाश्वत उपजीविका

FAQ-

  • What is the full form of MSRLM?

   Ans- Maharashta State Rural Livelihhod Mission

  • When was Maharashtra State Rural Livelihood Mission started?

   Ans-Maharashtra State Rural Livelihood Mission started in Julay 2011 under Societies Registration Act, 1860

  • What is the full form of CRP in SHG?

  Ans-Community Resource Persons

  • When National Rural Livelihood Scheme has been launched?
   Ans-National Rural Livelihood Scheme has been launched in 2010.NRLM was renamed as DAY-NRLM      (Deendayal Antyodaya Yojana – National Rural Livelihood Mission) with effect from March 29, 2016.
  • Which Ministry is NRLM under?
   Ans-Ministry of Rural Development (MoRD)

Share this:

9 thoughts on “महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान- उमेद Msrlm Umed Information In Marathi”

  1. मला उमेद अभियान संदर्भात विविध योजनांची माहिती मिळेल का….
    जय भवानी स्वयंसहाय्यता समुह
    रांजणगाव देवी, ता. नेवासा, जि. अहमदनगर
    मो.नं. 9970681902

    Reply
    • उमेद अभियानास तुमचा समूह जोडण्याकरिता व अभियानातील शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता तुमच्या तालुक्यातील तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,उमेद MSRLM कार्यालयास संपर्क करू शकता.

      Reply
  2. सखी महिला स्वयंसहायता समूह गोकुंदा मला महिला समुहासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती हवी आहे तरी ते मिळेल का

    Reply
  3. सर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कोणकोणते प्रशिक्षण दिले जाते याची सविस्तर माहिती मला मिळेल का आणि आमच्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात असे प्रशिक्षण मिळेल का
    माझा what’s app number 8329871702आहे या नंबरवर मला वरील माहिती पाठवा सर/मॅडम, “प्लीज”

    Reply

Leave a comment