PMFME Scheme In Marathi

PMFME Scheme in Marathi:

Contents hide
1 PMFME Scheme in Marathi:

आज आपण प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजना (pmfme) 2023 महाराष्ट्र या योजनेची सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. या लेखामध्ये आपण PMFME scheme in Marathi प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजना काय आहे,या योजनेचे स्वरूप काय आहे,या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण कोणते उत्पादन घेऊ शकतो,अनुदान मिळणार का,किती अनुदान मिळेल,अनुदान नेमक कोणाला मिळणार अशा प्रकारे तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखात पाहणार आहोत.

PM Formalization of Micro Food Processing Enterprises (PMFME):

ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य निधी हा ६०:४० या प्रमाणात आहे.स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत खालील घटकांना स्वतःचा अन्नप्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी शासनाकडून ३५% किंवा १० लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

योजनेचे नाव-PM Formalization of Micro Food Processing Enterprises (PMFME)प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजना

सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचे उद्दिष्ट –

  • सूक्ष्म उद्योगाची क्षमता वाढविणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे.
  • मायक्रो फूड प्रोसेसिंग, उद्योग बचतगट आणि सहकारी संस्थांकडून पतपुरवठा करण्याची क्षमता वाढवण्यास सक्षम करणे.
  • दोन लाख उपक्रमांचे औपचारिक फ्रेमवर्क हस्तांतरण समर्थन देणे.
  • अन्न प्रक्रिया क्षेत्रात संस्थांचे संशोधन प्रशिक्षण मजबूत करणे.
  • व्यावसायिक तांत्रिक समर्थनासाठी एंटरप्राइझमध्ये प्रवेश वाढवणे.

योजनेचे लाभार्थी कोण असतील-

  • शेतकरी
  • युवक
  • उद्योजक
  • शेतकरी कंपन्या
  • शेतकरी बचत गट
  • संस्था शेतकरी गट
  • महिला उद्योजिका
  • महिला बचत गट
  • बेदाणा शेड मालक
  • द्राक्ष प्रक्रिया व्यवसायिक
  • शेतीमाल व अन्नप्रक्रिया व्यवसायिक
  • शेतकरी उत्पादक सहकारी संस्था
  • विविध कार्यकारी संस्था
  • विकास अभिनव / नाविन्यपूर्ण सहकारी संस्था

पात्रतेच्या अटी-

अ) वैयक्तिक वैअर्जदार पात्रता अटी-

  1. अर्जदाराचे वय किमान १८ वर्ष पूर्ण असावे
  2. अर्जदाराचे बँकेत खाते असावे
  3. अर्जदाराची प्रकल्प किमतीच्या किमान १० % रक्कम गुंतविण्याची क्षमता असावी
  4. उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी स्वतःची अथवा करारावर जागा हवी
  5. एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहील

ब) बचत गट/शेतकरी गट/सहकारी संस्था पात्रता अटी-

  1. बचत गट/शेतकरी गट/सहकारी संस्था या नोंदणीकृत व लेखापरीक्षित असाव्यात
  2. सर्व सभासद क्रियाशील व सक्रीय असावेत
  3. सदरील संस्थेचे बँकेत खाते व वार्षिक उलाढाल असावी
  4. १०% स्वगुंतवण्याची क्षमता असावी.

प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजनेत कोणती उत्पादने येऊ शकतात?

या योजनेमध्ये खालील उत्पादने येऊ येतात.

  • नाशिवंत कृषी उत्पादने
  • बेदाणा प्रक्रिया
  • कुकूटपालन
  • मत्स्य पालन
  • तृणधान्य आधारित उत्पादन
  • मध
  • अन्न प्रक्रियेशी संबंधित सर्व उत्पादने जी आपण प्रक्रिया करून पाकेजिंग करून विक्री करू शकतो.

( pm fme scheme subsidy) प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत अनुदान किती मिळेल?

  • वैयक्तिक लाभार्थी भांडवली गुंतवणुकीकरिता ३५% अनुदान ( १० लाख रुपयांपर्यंत)
  • भांडवली गुंतवणूक व सामाईक पायाभूत सुविधा,गट लाभार्थी ३५% अनुदान कमाल शासनाच्या विहित मर्यादेत
  • मार्केटिंग व BRANDING ५०% अनुदान कमाल शासनाच्या विहित मर्यादेत
  • इनक्युबेशन सेंटर अनुदान-शासकीय संस्था -१००%,खाजगी संस्था -५०%,अनुसूचित जाती जमाती -६०%
  • स्वयंसहाय्यता गटातील सदस्यांना बीज भांडवल रु.४०,०००/- प्रति सदस्य ( MSRLM मार्फत)
  • प्रशिक्षणासाठी लाभार्थ्यांना १००% अनुदान

सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा कालावधी किती आहे?

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही सन २०२०-२१ ते २०२४-२५ पर्यंत या योजनेचा कालावधी असणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लवकरात लवकर लाभ घ्यावा. या योजनेसाठी पाच वर्षात १० हजार कोटींची तरतूद आहे

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक कागदपत्रे –

  1. अर्जदाराचे आधार कार्ड व PAN कार्ड फोटो
  2. अर्जदाराचे लाईट बिल/पाणी बिल/फोन बिल
  3. अर्जदाराचे बँक पासबुक झेरोक्स
  4. मागील ६ महिन्याचे बँक स्टेटमेंट
  5. व्यवसाय ठिकाणचा जागेचा उतारा / भाडेपट्टा करार
  6. व्यवसायासाठी आवश्यक मशिनरी कोटेशन
  7. बांधकाम इस्तीमेत व प्लान ( एकूण गुंतवणूक तपशील)
  8. २ वर्षांचे इनकम टेक्स रिटर्न ( विस्तारीकरण असल्यास)

सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेसाठी Offline अर्ज कुठे करावा?

वरील योजनेच्या अधिक माहिती  व लाभासाठी आपल्या तालुक्यातील पंचायत समिती मधील तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष उमेद (MSRLM) यांचेशी संपर्क करावा किंवा कृषी सहाय्यक/मंडळ कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचेशी संपर्क करावा.

Share this:

Leave a comment